डॉक्टरांच्या अंतर्गत बदल्या

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्टरांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि गट ’ब’ मधील वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी त्वरीत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड (भोसरीतून वायसीएमएच), डॉ. गोविंद तळपाडे (प्राधिकरणातून पिंपरीगाव), डॉ. वर्षा डांगे (कुटुंब नियोजन विभागातून वायसीएमएच), डॉ. विकल्प भोई (आकुर्डी रुग्णालयातून बोपखेल), डॉ. सुनीता साळवे (यमुनानगरातून आकुर्डी), डॉ. गितांजली कोल्हे (यमुनानगरातून वाल्हेकरवाडी), डॉ. संध्या भोईर (वाल्हेकरवाडीतून म्हेत्रेवस्ती) बदली करण्यात आली आहे.

डॉ. स्मिता नागरगोजे (नेहरुनगरातून यमुनानगर), डॉ. रामनाथ बच्छाव (भोसरीतून यमुनानगर), डॉ. किशोरी नलवडे (थेरगावातून तालेरा), डॉ. आसावरी ढवळे (यमुनानगरातून थेरगाव), डॉ. छाया शिंदे (यमुनानगरातून नेहरुनगर), डॉ. राजीव शहारे (पोस्ट मार्टेम विभागातून यमुनानगर), डॉ. अंजली ढोणे (तालेरा रुग्णालयातून पुनावळे) बदली झाली आहे. डॉ. श्रीराम भंडारे (पोस्ट मार्टेमणधून सांगवी), डॉ. संजय पोटे (पिंपरीगावातून प्राधिकरण), डॉ. राहुल साळुंखे (पोस्ट मार्टेम विभागातून आकुर्डी), डॉ. तृप्ती सांगळे (वायसीएमएच् मधून वैद्यकीय मुख्य विभाग), डॉ. मेधा खरात (वायसीएमएच् मधून भोसरी), डॉ. प्रकाश ताडे (भोसरीतून सांगवी), डॉ. स्नेहा जगदाळे (सांगवीतून भाटनगर) यांची बदली केली आहे.