डॉक्टरांनी रुग्णांची मनस्थिती समजून घेण्याची आवश्यकता

0

भुसावळ। एखादा गंभीर रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी आल्यास रुग्णांच्या नातेवाईकांची मनस्थिती देखील नाजुक असते. अशा वेळेस डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती पाहून रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता समजून घ्यावी, सहकार्याची भावना ठेऊन वागणूक करावी, तरी देखील काही विपरीत परिस्थिती ओढवल्यास पोलीस प्रशासन सदैव आपल्या पाठीशी असून कुठल्याही क्षणी मदत मागितल्यास आम्ही धाऊन येऊन असे आश्‍वासन उपविभागीय पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दिले. डॉक्टरांवर वाढते हल्ले व रुग्णालयाची सुरक्षितता यासंदर्भात आयएमए सभागृहात सोमवार 2 रोजी दुपारी 3 वाजता बैठक घेण्यात आली. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस स्थानकाचे वसंत मोरे, तालुका पोलीस स्थानकाचे मनिष कलवानिया, बाळासाहेब गायधनी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिपक जावळे उपस्थित होते.

सीसीटीव्ही यंत्रणा बसवा
यावेळी डिवायएसपी निलोत्पल म्हणाले की, रुग्णालयाच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी यावरुन तपास कार्यात देखील सहकार्य मिळते. तसेच दोेषींना शिक्षा होण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले.

हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी
डॉ. दिपक जावळे यांनी सांगितले की, राज्यात डॉक्टरांवर वाढते हल्ले हि चिंताजनक बाब आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांवर हल्ला करुन काहीच साध्य होत नाही. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई पोलीस प्रशासनाने करावी, त्यांना जामीन मिळणार नाही यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरुन भविष्यात असे हल्ले करण्यास कुणी सहजासहजी धजावणार नाही, पोलीस प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून अत्यावश्यक दूरध्वनी सेवा कार्यान्वित करावी जेणेकरुन ताबडतोब पोलीस मदत मिळू शकेल. जर डॉक्टरांची काही चुक असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी कुठल्याही चुकीचे आम्ही समर्थन करीत नाही, मात्र यासाठी कुणीही कायदा हातात न घेता कायद्याच्या आधीन राहूनच कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ. रेश्मा जावळे, डॉ. संजय पाटील, डॉ. निलम नेहेते, डॉ. मनिषा दावलभक्त, डॉ. नितीन पाटील, डॉ. प्रविण महाजन, डॉ. सुनिल नेहेते, डॉ. एस.एम. पाटील, डॉ. उमेश नेहेते, डॉ. विजयनाथ चौधरी, डॉ. विनायक महाजन, डॉ. संजय नेहेते, डॉ. विकास कोल्हे, डॉ. निलेश महाजन, डॉ. महेंद्र चौधरी, डॉ. नितीन गोठवाल डॉ. राजेश गुप्ता उपस्थित होते.