नवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या परिस्थितीत आरोग्य विभाग सीमेवरच्या जवानांप्रमाणे लढा देत आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना धीर देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आता जबर शिक्षा होणार आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर आता अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद होणार असून 6 महिने ते 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. 1 ते 5 लाखांपर्यंत दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली.