डॉक्टर डे निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत धावले हजारो डॉक्टर

0

पिंपरी-‘रन फॉर हेल्थ’ असा संदेश देत पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर्सनी मॅरेथॉन स्पर्धेत उस्फूर्त स्पर्धेत सहभाग घेतला. डॉक्टर्स ‘डे’ च्या निमित्ताने रविवार पिंपरी चिंचवड परिसरातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी मिळून भोसरी प्राधिकरण स्पाईन रोड येथुन मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो डॉक्टर धावले.

आजच्या स्पर्धेत , महिला आणि पुरुष धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात वाजता महाविद्यालयापासून स्पर्धेस प्रारंभ झाला. पिंपरी-चिंचवड पुणे परिसरातील 1100 डॉक्टर्स या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये झाले होते. 400 महिला डॉक्टर होत्या. ही स्पर्धा भोसरी प्राधिकरण स्पाईन रोड एमआयडीसी पोलिस स्टेशन मार्गे तीन , पाच, दहा किलोमीटर अशी मॅरेथॉन झाली. सकाळी सहा वाजता झुंबाने मॅरथॉनला सुरुवात झाली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ढोल ताशा पथक होते. या स्पर्धेचे नियोजन डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कुबडे यांनी केले.