आदित्य बिर्ला हॉस्पिटलने राबविला उपक्रम
चिंचवड- डॉक्टर दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील पहिले जॉईंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय), अमेरिका आणि एनएबीएच हॉस्पिटल मुल्यांकन प्राप्त हॉस्पिटल असलेल्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या डॉक्टर्सबरोबर वृक्षारोपण मोहीम राबविली.
डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण वैद्यकीय समाजाचा सन्मान करण्यासाठी भारतात साजरा केला जातो. हा आदित्य बिर्ला समुहाच्या शाश्वतता अभियानाचा भाग होता. ज्यामध्ये वृक्षारोपण हा जैवविविधता उपक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक आरोग्य सुविधांच्यावतीने 100 पेक्षा जास्त झाडे डॉक्टरांच्या साथीने लावण्यात आली. तसेच, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचारी वर्गासाठी खास चर्चासत्र आयोजित केले होते.
वृक्षारोपणाचे अनेक उपयोग
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या, वृक्षारोपण करण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. यातून स्वच्छ हवा, चांगला पाऊस मिळतो आणि ग्लोबल वॉर्मिंग टळते. पण आपल्यापैकी कोणालाही थोडे कष्ट करून झाडे लावायला वेळ नसतो. आम्ही विचार केला की राष्ट्रीय डॉक्टर दिन हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांना प्रतिज्ञा घ्यायला लावण्याचा आणि आमच्या शाश्वतता अभियानात सहभागी करून घेण्याचा अगदी योग्य दिवस आहे