तळेगाव : बैलपोळा व नवरात्र उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा तसेच याच उत्सवामध्ये डॉल्बी सिस्टीम वापरू नये, असे अवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी केले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची बैठक तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जाधव यांनी मार्गदर्शन केले. नवरात्र उत्सवात वर्गणी गोळा करताना नागरिकांवर जबरदस्ती करू नये. मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कमेरे बसवण्यात यावे, मंडळांनी स्वःताचे स्वयंसेवक नेमावेत, ध्वनी प्रदूषण टाळावे अश्या सूचना जाधव यांनी केल्या. याप्रसंगी सर्व पोलीस पाटलांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांचा सत्कार केला. पोलीस पाटील एस.एम.पवार, समीर शेख, गुलाब आंबेकर, लक्ष्मण शितोळे, दुर्गा घारे, पद्मा वाजे, वर्षा घुटकुले आदी पोलीस पाटील उपस्थित होते.