डॉ. अनिल पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

0

भुसावळ । संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे मानवविज्ञान विद्याशाखा अंतर्गत इतिहास या विषयात खान्देशातील स्वातंत्र चळवळीत बौद्ध, जैन व मुस्लीम ई अल्पसंख्याकाचे योगदान : एतिहासीक अभ्यास (1920 ते 1947) यामध्ये संशोधन केल्याने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. सदर पीएच.डी. पदवीसाठी डॉ. के.डी. ढेकणे यांचे मार्गदर्शन मिळाले असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर, चंद्रशेखर शिखरे, सुरेंद्र पाटील, विशेष कारागृह महानिरिक्षक बी.डी. केदारे, कारागृह निरीक्षक एस.एन. चव्हाण व आर.बी. बोरकर यांनी सहकार्य केले.