डॉ.आंबेडकर पुतळा चौकाच्या रुंदीकरणासाठी धरणे

0

धुळे।  येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या रुंदीकरण व नुतनीकरण व सुशोभिकरणाच्या मंजुरी मिळावी या मागणीसाठी महापालिका प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जेल रोड वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळा हा गेल्या अनेक वर्षापासून असुन या भागात मधुर शॉपिंग सेंटरचे बांधकाम रस्त्यावर आल्याने येथील जागा अरुंद झाली आहे. हे अतिक्रमण काढुन चौक रुंद करावा तसेच या चौकात अशोक स्तंभ तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक व शहर वाहतूक शाखेची संरक्षक भिंत 20 फुट मागे घ्यावी.

आंदोलनात यांचा सहभाग
सुशोभिकरणासाठी मंजुर झालेल्या 12 लाखांच्या खासदार निधीतून कामे सुरु करावीत तसेच या चौकाला दादासाहेब सुकदेव दामोदर यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा 27 तारखेला मनपा आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानुसार मनपा प्रवेशव्दाराजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी वाल्मिक दामोदर, एम.जी.धिवरे, गुलाबराव खैरनार, राजू शिरसाठ, मिनाताई बैसाणे, किरण जोंधळे, शंकर अण्णा थोरात, हरिचंद्र लोंढे आदी उपस्थित होते.