जळगाव । केशवस्मृती सेवासंस्था समूह नावाचा वटवृक्ष उभा करणारे स्व.डॉ.अविनाश आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार संस्था आणि व्यक्ती यांनी समाजाप्रति समर्पित भावनेने केलेल्या सेवेबद्दल दिला जातो. माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पुरस्कार समितीने वर्ष 2016-17 साठी पुढील पुरस्कारार्थीची निवड केल्राची माहिती चेअरमन डॉ. अनिल राव यांनी सांगितले.
मान्यवरांची राहणार उपस्थिती
या पत्रकार परिषदेस समिती सदस्य केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर, उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव, संचालक सतीश मदाने आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. या समितीमध्ये सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे, धुळे येथील विख्यात तत्वज्ञ व सनदी लेखापाल प्रकाश पाठक सदस्य आहेत. रविवार 4 मार्च 2018 रोजी सायंकाळी 5.30 वा.बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यावेळी जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा.दत्तात्रय कराळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे (डॉ.हेडगेवार रूग्णालय) सचिव डॉ.अनंत पंढरे प्रमुख वक्ते असतील.
यांना जाहिर झाला पुरस्कार
पुरस्कारार्थी संस्थात्मक गटातून यवतमाळ येथील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाला पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्याांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी काम केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला तर व्यक्तिगत गटातून मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे.