जळगाव । ग्रंथीरोग तज्ञ डॉ. आशुतोष सोनवणे यांची सेवा रविवार दि 10 डिसें रोजी गोदावरी हॉस्पीटल येथे उपलब्ध राहणार असून 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मोफत मधुमेह शिबिरातील रूग्णांची रिपोर्ट तपासणी व मार्गदर्शन मोफत करणार आहे. जागतिक मधुमेह दिनानिमीत्त गोदावरी हॉस्पीटल येथे घेण्यात आलेल्या मधुमेह तपासणी शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात 220 रूग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरातील रूग्णांचे रिपोर्ट मोफत तपासणार असून पुढील मार्गदर्शनही करणार आहे.
लाभ घेण्याचे केले आवाहन
दर महिन्याच्या दुसर्या रविवारी डॉ. आशुतोष सोनवणे हे गोदावरी हॉस्पीटल येथे उपलब्ध राहणार असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुबंईच्या नायर हॉस्पीटल येथे झाले आहे. एमडी मेडीसीन म्हणुन ते प्रख्यात आहेत. तसेच इन्डोक्रोनॉलॉजीमध्ये त्यांनी डीएम केले आहे. मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडीकल कॉलेज येथे मेडीकल कन्सलटंट म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. तसेच ते मधुमेह, थॉयरॉइड, ग्रंथीरोग तज्ञही आहेत. खान्देशातील गोर गरीब आणि गरजु रूग्णांना उपचाराची सुविधा व्हावी यासाठी डॉ. आशुतोष सोनवणे हे दर महिन्याच्या दुसर्या रविवारी सकाळी 9 ते 5 यावेळेत भास्कर मार्केटजवळील गोदावरी हॉस्पीटल येथे सेवा देणार आहेत. तरी या सेवेचा रूग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवानही गोदावरी हॉस्पीटलतर्फे करण्यात आले आहे. तसेच रूग्णांना विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यातच तज्ज्ञांकडून आजारांवर सल्ला देखील देण्यात येणार आहे.