पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य व आधुनिक विज्ञान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान बुधवारी (दि.28) सायं. 6. 30 वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.