डॉ. खोलेंची तक्रार घेणार्‍या पोलिसाला निलंबित करा

0

मुंबई । पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला, म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करणार्‍या डॉ. मेधा खोले यांचा गुन्हा दाखल करून घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यास निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

खोले यांनी जातीपातीची मूळे किती खोलवर रुजलेली आहेत, हेच दाखवून दिले. जे कालपर्यंत जात मानत नाही, असे बोलत होते, ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. तसेच ज्या मूर्ख पोलिस अधिकार्‍याने हा गुन्हा दाखल केला, त्याची ओळख सबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणून, त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.