डॉ. डी. वाय. पाटीलमध्ये रोबोटिक्स स्पर्धा उत्साहात

0

आकुर्डी : येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात टेक्निकल इव्हेंट अंतर्गत विविध प्रकल्पांचे सादरीकरण व रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध उपयोगी रोबोटिक प्रकल्प सादर केले.

स्पर्धेमध्ये एस पी एस चिपळूण कॉलेज, जे. एस. पी. एम. कॉलेज, ताथवडे, पी. सी. सी. ओ. ई. आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी या महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यावेळी आदित्य डुकरे, कमलेश डावरे, निखिल गुरव, रेवती बोहरा, प्रा. किरण नारकर, आयुष अग्रवाल, प्रा. अमित उंब्रजकर, प्रा. अमृता अंदवत, प्रा. विश्‍वनाथ सोलापूरे, सचिन पाटील, राजेश पोरे, गणेश ढोरे, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, संचालक एस. के. जोशी, प्राचार्या अनुपमा पाटील, कुलसचिव वाय. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.