डॉ.तुषार शेवाळे यांचा ‘मालेगाव रत्न’ पुरस्काराने गौरव

0

शिंदखेडा – मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे अध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य जलदुत व सैनिक मित्र डॉ. तुषारदादा शेवाळे यांना मालेगांव रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे धुळे व मालेगाव परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मफ्ती मोहमद इस्लाईल, नगरसेवक ज्योती भोसले, माजी महापौर ताहेरा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सदर पुरस्कार डॉ. तुषार शेवाळे यांना मिळाल्याने धुळे जिल्ह्यातील विविध गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. डॉ. तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्रबळ दावेदार उमेदवार मानले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे जनजागृती
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक चे अध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य जलदुत व सैनिक मित्र जलदुत व सैनिक मित्र डॉ. तुषार शेवाळे यांनी गेल्या 30 वर्षांपासून पाणीआडवा पाणी जिरवा, शेती सिचंनाचे उपक्रम, देशसेवा करणारे सैनिकाना व परिवाराला वैद्यकीय मदत तसेच शहिद जवानाना आथिॅक मदत तसेच सामाजिक वैद्यकीय सेवा अविरत सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जनता न्युज चॅनल व वेबसाईट मालेगाव यांच्या वतीने डॉ. तुषार शेवाळे यांना ‘मालेगाव रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.