देशद्रोह पसरवणार्या संस्थेवर बंदी आणण्याची अंनिसची मागणी
भुसावळ- डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला पाच वर्षानंतर यश आले आहे मात्र पोलिसांनी या हत्येच्या घटनेमागील मुख्य सुत्रधारास त्वरीत अटक करून देशद्रोह पसरवणार्या संस्थेवर कायमस्वरूपी बंदी आणावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले. प्रत्येक धर्माला संरक्षण देण्याची हमी भारतीय संविधानाने दिली आहे मात्र काही विघ्नसंतोषी संस्थांकडून धर्म संकटात असल्याची वल्गना करून देशद्रोहाचे काम केले जात आहे. अशा संस्थांवर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदी आणणे गरजेचे असून या घटनेतील मुख्य सुत्रधारास त्वरीत अटक करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले.
यांचा उपोषणात सहभाग
एक दिवसीय उपोषणात अरुण दामोदर, शामकुमार वासनिक, सागर बहिरूणे, मनोजकुमार नंदागवळी, शांताराम जाधव, प्रा.निलेश गुरूचल, अशोक शिंदे, भगवान निरभवणे, नरेश वाघ, पी.के.सपकाळे, शिवदास मेढे, बळीराम भोई, शशिकांत राईमळे, अंजना निरभवणे, सुरेंद्र हिवाळे, राकेश उज्जैनवाल, आर.बी.चरण, एस.झेड.गवळी, शारदानंद तायडे, जगदेव तायडे, मुरलीधर सोनवणे, के.एम.वाघ, चंद्रमणी सपकाळे, सुदाम सोनवणे, अनिल सोनवणे, अनिल इंगळे, उमेश चाबुकस्वार, शुभम सोयंके, नरेंद्र मोरे, भीमज्योत शेजवळ, राजेश तायडे, सुदर्शन सोनवणे, संदीप सपकाळे, बाळू सोनवणे, विजय संनासे , सिद्धार्थ गायकवाड, गौतम मित्र आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.