मुंबई : हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या चौकशीतून त्यांच्यापैकी एकाचा दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट संबंध असल्याचे उघड झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनी यश आले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या गेल्या आठवड्यात शुक्रवारी महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथील भंडार आळीत छापा टाकला. वैभव राऊत याच्याकडून शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. त्याच्या संपर्कात असलेल्या शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांनाही अटक करण्यात आली.
हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या चौकशीतून त्यांच्यापैकी एकाचा दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट संबंध असल्याचे उघड झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन प्रकाशराव अंदुरे याला सीबीआयच्या पथकाने शनिवारी औरंगाबाद येथून अटक केली.