डॉ. नाईक यांच्या सोनोग्राफी सेंटरवर दंडात्मक कारवाई

0

धुळे : डॉ.सुनिल नाईक यांनी नुतणीकरणाचा प्रस्ताव 25 दिवस उशिरा सादर केल्याने त्यांना प्रतिदिन रु.500/- प्रमाणे 27 दिवसाचे रु.13500/- दंड करुन त्यांचे सोनोग्राफी मशीन दि. 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2017 या 5 दिवसांसाठी तात्पुरते स्वरुपात सील करावे व डॉ.नाईक यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारी 2017 रोजी त्यांना नुतनीकरण प्रमाणपत्र देण्यात यावे असे महानगरपालिका सभागृहात झालेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय समितीचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत येशीराव यांनी घेतला.

बैठकीत घेतला निर्णय
यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत येशीराव, समितहीचे सदस्य अनुक्रमे आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे , मेडिकल जेनेटिक्स डॉ.संदीप शिलाहार, जिल्हा माहिती कार्यालयचे प्रतिनिधी संजय बोराळकर, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत भदाणे, क्रांती बहुद्देशीय महिला संसथेच्या अध्यक्षा आशा वसईकर, सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले, स्त्रीरोग प्रसुतीतज्ञ डॉ. विजया माळी, बालरोगतज्ञ डॉ. नीता हटकर, पीसीपीएनडीटी विभाग प्रमुख डॉ. एम.आर.शेख, पीसीपीएनडीटी झोनल ऑफीसर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ.आर.डी.पाटील,डॉ. जे.सी.पाटील, डॉ. जे.एस.पाटील, मातृसेवा हॉस्पीटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुनिल नाईक आदी उपस्थित होते.