नवी सांगवी (प्रतिनिधी) – येथील आदित्य डेंटल अँण्ड इनप्लांट सेंटरचे संचालक दंत्यचिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांना इंटरनॅशनल इक्सलन्स कमिटीचा इंटरनॅशनल इक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विभागीय पातळीवर अतिउच्च वैद्यकीय सेवा देणार्या रुग्णालयाची एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून निवड करुन इंटरनँशनल इक्सलन्स समितीच्या मार्फत हा जागतिक पातळीवरील पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी दंतचिकित्सक असलेल्या डॉ. आदित्य पतकराव यांची निवड करण्यात आली होती. समितीतर्फे थायलंड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर पतकराव यांचा गौरव करण्यात आला. याविषयी बोलताना डॉ. पतकराव म्हणाले की, या पुरस्काराने आधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे. दरम्यान डॉ. आदित्य यांना यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.