जळगाव। डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मोफत हदयरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 30 जूनपर्यंत हे शिबिर सूरू राहणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एन्जीओप्लास्टी व बायपास मोफत केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक हदयरोग विभाग असा नावलौकीक प्राप्त असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात 30 जून पर्यंत हे शिबिर होणार आहे. जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या वैद्यकिय रूग्णालयात हे शिबिर होईल. फिलीप्स अॅल्युर एक्सपर एफ डी 10 ही कॅथलॅब येथे कार्यान्वीत असून 40 बेडचा सूसज्ज हदयरोग अतिदक्षता विभाग, मॉडयुलर ऑपरेशन थिएटार्स, 4 डी इकोकॉर्डीओग्राफी, अत्याधुनिक रेडीओलॉजी, पॅथॉलॉजी आणि रक्तपेढी यामूळे हदयउपचार घेणे सूरक्षीत समजले जाते.
अनुभवी व प्रशिक्षित टीम उपचारासाठी उपलब्ध
यात डी.एम.कॉर्डीओलॉजीस्ट डॉ रमेश मालकर यांचेसह अनुभवी व प्रशिक्षीत कॉर्डीयाक टीम उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या शिबिरात योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशनकार्ड धारकांना मोफत एन्जीओप्लास्टी, बायपास, हदयास असलेले छीद्र,पेसमेकर इम्प्लंट,बिंटींग हार्ट,मिनिमल इन्वेजिव शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे. आतापर्यंत या शिबिरात 1533 रूग्णांनी तपासणी करून घेतली असून 200 च्यावर रूग्णांवर मोफत एन्जीओग्राफी देखिल करण्यात आली. 45 रूग्णांवर मोफत एन्जीओप्लास्टी तर 9 रूग्णांवर बायपास करण्यात आली. डॉ मालकर यांचेसह तज्ञ टीमने या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.