डॉ.प्रशांत महाजन यांना एम.डी.साठी सुवर्ण पदक

0

शिरपूर। धुळे शहरात त्वचारोग तज्ञ म्हणून नावारूपास आलेले डॉ.डी.वाय.महाजन यांचा मुलगा डॉ. प्रशांत महाजन यांना नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील त्वचारोग या विषयात एम.डी.ला सुवर्ण पदक मिळाले.

धुळ्यातील डॉ.डी.वाय.महाजन यांनी त्वचारोग तज्ञ म्हणून चांगल्याप्रकारे ख्याती मिळविलेली असतांनाच त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा डॉ. प्रशांत महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रात उडी घेत चांगल्या प्रकारे यशाचे शिखर गाठले आहे. त्यांचे पहिले ते 10 वी पर्यंतचे शिक्षण हे धुळे येथील न्यु सिटी हायस्कुलला तर 11वी व 12वी जयहिंद कॉलेजला झाले आहे. त्यानंतर एम.बी.बी.एस. व एम.डी.चे शिक्षण हे वर्धा येथील नेहरू मेडीकल कॉलेजला झाले असून त्वचारोग विषयातील एम.डी.परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. डॉ.प्रशांत महाजन यांना त्वचारोग विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांना वर्धा येथे दि.13 रोजी झालेल्या पदवीदान समारंभात भारत सरकारच्या आयुष विभागातील केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक देवून गौरविण्यात
आले.