डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरवस्था

0

नवी मुंबई : वाशी से. 9 येथे असलेल्या परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचे रुपांतर मिनी जंगलात झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या उद्यानात काटेरी वनस्पती वाढल्याने प्रवेश करणेच अवघड झाले आहे. त्यामुळे उद्यान मद्यपींचा अड्डा झाले असल्याने प्रत्येक कोपर्यात बियरच्या बाटल्या आढळत आहे. उद्यानाला परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले असले तरी या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्य मैदानाची दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरीत बसविले बाकडे तुटल्याने गैरसोय होत आहे.

सुशोभिकरणाची मागणी
नवी मुंबईत वाशी सेक्टर 9 येथे जेएन 1 ते 2 पद्धतीच्या इमारती बांधलेल्या आहेत. त्यात अंदाजे एकहजार कुटुंबे राहतात. या कुटुंबातील लोकांसाठी माजी नगरसेवक शंकर माठे यांनी या उद्यानाची शुशोभिकरण करून सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण असलेल्या गेटचे सुध्दा नामोशेष झाले आहे. उद्यान विभाग आपली जबाबदारी झठकून साफसफाईवाल्याचे काम म्हणून सांगतात मात्र साफसफाईचा काशिनाथ नावाचा सुफरवायझर तर साफ नाकार देत असल्याचे रिपब्लिकन सेना नवी मुंबई चे लक्ष्मण ढवळे यांनी सांगितले गेली काही दिवसांपासून उद्यानाची दुरवस्था असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त करत उद्यान सुशोभित करण्याची मागणी केली आहे.

उद्यानात मुलांनी मैदान कुठे?
घसरगुंडीच्या शिडीवर घाणेरडी कपडे तर घसरगुंडीवर काटेरी झुडप पडल्याने येथे खेळणे धोकादायक झाले आहे. लहान मुलांचा व्यायाम व्हावा म्हणून स्क़्युअर क्यूबवर बसवले आहे. परंतू जंगली झाड्यांच्या वेलींचा वेढा त्याला पडला आहे. या गैरपरिस्थितीचा फायदा घेत कचरा व प्लास्टिक पिशव्यांचा खच तेथे साचला आहे. त्यामुळे संध्याकाळी खेळण्यासाठी उद्यानात मैदान गरजेचे येथील लहानमुलांसह नागरिकांना वाटत आहे.