नंदुरबार । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानपीठ प्रतिष्ठान तसेच सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय, विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित सामाजिक समतेचे प्रणेते : महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” अंकाचे प्रकाशन खा.डॉ. हिनाताई गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्यासह विविध अधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी “सामाजिक समतेचे प्रणेते : महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या अंकाचे प्रकाशन खा.डॉ. हिनाताई गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील, समाज कल्याणचे सहा.आयुक्त राकेश महाजन, जात पडताळणी सहा.आयुक्त माधव वाघ, उपजिल्हाधिकारी श्री. जगदाळे, अंजली पठारे, डॉ. माधव कदम आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मानव उत्थानाचा दृष्टीकोन
या अंकात संशोधक, लेखक, विचारवंत व प्राध्यापकांचे शोध निबंध सादर होऊन विचार मंथन घडवले गेले आहे. या संशोधकांच्या शोध निबंधांमार्फत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वावर विविधांगी प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातून समस्त समाजाला, राजसत्तेला आणि विचारवंतांना एक निश्चित दिशा मिळावी, मानवाच्या उत्थानासाठी विविध दृष्टीकोनातून अभ्यास व्हावा, हाच हेतू या कार्यामागे आहे.
अंकासाठी पुढाकार
या अंकाच्या प्रकाशनांसाठी ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगांवकर, सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय, विसरवाडीचे प्राचार्य डॉ. ए.टी. पाटील, अंकाचे संपादक डॉ. मधुकर देसले, प्रा. गौतम थोरात व डॉ. निशांत शेंडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. पी.ए. भामरे, डॉ. सुनिल कुवर, प्रा. व्ही.जी. सोमकुवर, प्रा. एम.एस. वाघमारे, प्रा. राहुल मेघे, प्रा. ए.डी. आखाडे, प्रा. विलास पंडीत, प्रा. विशाल करपे, प्रा. अजित हिरकणे आदी उपस्थित होते.