डॉ. भोळे यांचा सन्मान

0

उरुळी कांचन- नि:स्वार्थपणे मानवतेची सेवा करणार्‍या आणि लाखो रुग्णांचे प्राण वाचवून त्यांना नवे जीवन देणार्‍या डॉक्टरांचे कार्य महान आहे. सर्वसामान्य माणसालाही चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. समर्पित भावनेतून डॉक्टरांनी काम करावे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. रवींद्र भोळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत हवेली तालुका महानुभाव परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे यांनी व्यक्त केले.

अहोरात्र सामाजिक जाणीव ठेवून जनसेवेचे कार्य सुरू ठेवणार्‍या हभप ज्येष्ठ समाजसेवक उरुळी कांचन डॉक्टर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांचा डॉक्टर दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुंजीर, रोहिणी कुंजीर, उज्ज्वला कुंजीर, पत्रकार अमोल भोसले उपस्थित होते.