डॉ.रवींद्र चौधरींची भाजपा प्रवेशपूर्व बैठक

0

नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्राम गृहावर शुक्रवारी सायंकाळी डॉ.रवींद्र चौधरी यांच्या भाजपा पक्ष प्रवेश पुर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व समाजातील जेष्ठ व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. बैठकीत सर्वांची मते जाणून घेऊन आगामी नगरपालिका निवडणुकीची रणनीति आखण्यात आली.

आगामी निवडणुकीची आखण्यात आली रणनिती
याप्रसंगी आ.शिरीष चौधरी,भाजपा शहराध्यक्ष मोहन खानवानी,नगरसेवक ईश्वर चौधरी,मार्केट कमिटी सदस्य किसन माळी, माळी समाजाचे अध्यक्ष आनंद माळी, माजी उपनगराध्यक्ष शाम मराठे, माजी नगरसेवक सुधाकर मराठे, (पहेलवान),माजी नगरसेवक विठ्ठल चौधरी,माजी विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. चारुदत्त कळवनकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता जैसवाल,शिवसेनेचे सुनील सोनार, केतन रघुवंशी,पप्पु कुरेशी,अ‍ॅड धनराज गवळी,संदीप ठाकुर,भरत चौधरी,कमल ठाकुर,धर्मेंद्र रघुवंशी,धर्मेंद्र पाटिल,संतोष पाटिल,लक्ष्मण माळी,संजय शाह,नरेंद्र माळी,चंद्रकांत भोई व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.