उरुळी कांचन:कोविड 19 महामारीच्या भयग्रस्त व भीतीयुक्त काळात डॉ.रविंद्र भोळे ह्यानी अहोरात्र वैद्यकीय सेवा केली आहे. खोडोपाडी त्यांनी रुग्णसेवा केली आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील समर्पित भावनेने केलेले रचनात्मक सामाजिक, वैद्यकीय कार्ये हे अनमोल आहे. डॉ भोळे शांतिसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायचे उर्जास्तोत्र असून डॉ.भोळे ह्यांचे विविध क्षेत्रातील समर्पित निष्काम कर्मयोगी कार्ये अनमोल आहे असे प्रतिपादन प.पु.रविराज दादा पंजाबी ह्यानी येथे व्यक्त केले.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने करोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ.रविंद्र भोळे ह्यांचा सन्मान करण्यात आला. मराठवाडा भूकंप, गॅस्ट्रो साथ उरुळी कांचन, पर्यावरण कार्ये, वृक्षारोपण, अपंगसेवा, दुष्काळ ग्रस्त मदत कार्ये,स्वयंसेवी संस्थांना अर्धीक मदत मिळून देणे, कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रमाद्वारे स्फूर्ती देणे, विश्वकर्मा मुक्त विश्व विद्यापीठ मार्फत विविध वोकॅशनल ट्रेनिंग कोर्सेस दिले.डॉ.मानिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित एनजीओच्यावतीने अनेक उपक्रम राबविले आहेत.