मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या पुढील समस्या निर्माण होणार आहे.यांससाठी कुलगुरुना पदावरून हटवण्याची मागणी मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस यानी केली.
कलगुरूंची निवड करताना खूप मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, केवळ कोणाच्या शिफारशी मुळे वा वशिल्याने काय होऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ संजय देशमुख. हे काही वर्षांपूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत काम करायचे, जिथे विनय सहस्रबुद्धे महासंचालक होते. त्यानंतर ते मुबई विद्यापीठात जीव शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे विभागप्रमुख झाले. या महाशयांनी विद्यापीठात अधिसभा, विद्वत परिषद, व्यवस्थापन परिषद अशा प्राधिकरणावर काम केलेले दिसत नाही अथवा असले तर सक्रिय काम केलेले नाही. विद्यापीठ प्रशासन व परीक्षा विभाग यातील कामाचा कोणताही अनुभव यांच्याकडे नाही.विद्यापीठाच्या कोणत्याही अन्य समितित यांनी काम केलेले नाही.मग निवड समितीने कोणत्या निकशांवर यांची एव्हढ्या महत्वाच्या पदावर नियुक्ती केली हे कळत नाही. केवळ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि विनय सहस्रबुद्धे यांच्याशी असलेले पूर्वीचे नाते हाच निकष लावला असावा. अशा अपात्र, विद्यापीठ यंत्रणेशी पूर्ण अपरिचित व्यक्तीची नेमणूक लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाचे कसे वाटोळे करू शकतो हेच सिद्ध होते.मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अस्तिवात नसल्याचा हवाला देऊन कोणत्याही प्रकारची समिती न नेमता फक्त एकाधिकार शाहिने ऑनलाईन पेपर तपासणीचा निर्णय घेतला होता या निर्णयानेच विद्यार्थांचे आयुष्य नुकसान झाला.मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुनी अजून पर्यंत मुंबई विद्यापीठासाठी पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकाची नेमणूक करू शकलेले नाहीत. मुंबई विद्यापीठाचा आणि कुलगुरूंचा हलगर्जी पणामुळे निकाल उशिरा लागणार मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थाना ह्या वर्षी देशांतर्गत आणि विदेशातील प्रमुख विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागेल, ह्या विद्यार्थांची उच्चशिक्षणाची वाट कायमची बंद झालेली आहे ह्या मुळे मुंबई विद्यापीठच्या गुणी आणि होतकरू विद्यार्थांचे नुकसान अटळ आहे ह्यास कुलगुरू जवाबदार आहेत. “ऑन लाईन पेपर तपासणी साठी इंजिनीरिंग ह्या विषयाची पेपर तपासणी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे ह्याच अनुभवी कंपनीला कंत्राट का नाही देण्यात आले? या एकाच मेरीट ट्रॅक या कंपनीला कंत्राट का देण्यात आले ? त्यानंतर संपूर्ण कंत्राट मेरीट ट्रॅक कंपनीलाच दिले मुंबई विद्यापीठ कायदा २०१७ (कलम८९) ह्या प्रमाणे पंचेचाळीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित असताना विद्यापीठाने ह्या कायद्याचे उलंघन केलेले आहे व अश्याप्रकारे विद्यापीठाने विद्यार्थांची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे. विद्यार्थांशी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा. विद्यापीठात ऑन लाईन पेपर तपासणी साठी प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली नव्हती त्यामुळे बहुतेक प्राध्यापकांना ह्या यंत्रणेशी जुळवून घेण्यासाठी जड जात होते ह्याचा परिणाम विद्यार्थांच्या निकालावर होणार आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रात लागू झाला तर मग जवळपास ३ महिन्यान मध्ये कोणत्याही प्रकारची समिती किंवा प्र-कुलगुरू यांची नियुक्ती का नाही केली ? कि ऑन लाईन पेपर तपासणी चा निर्णय घेताना कोणत्याही समितींची अडचण नको ह्या उदेशाने समिती नेमली गेली अश्या प्रकारे संशय घेण्यास संपूर्णपणे वाव आहे .विद्यापीठाच्या ऑन-लाईन पेपर तपासणीच्या गैर कारभारामुळे ह्या वर्षी पुंर्मुल्याकन तसेच फोटोकॉपी साठी विद्यार्थीची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे ह्या मुळे विद्यार्थांच्या मागे पुढील २वर्ष शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.मुंबई विद्यापीठच्या कुलगुरूनी ऑन-लाईन पेपर तपासणी ची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिलेली नव्हती. हि माहिती लपवून किंवा एकाधिकारशाही राबविण्याचा मानस असल्यामुळे आज विद्यार्थांना फटका बसलेला आहे.विद्यापीठाच्या कुलगुरुना बडतर्फ करण्यास पुरेसे आहेत स्व:तच्या अख्यारीत तुघलक निर्णय घेण्यामुळे तसेच परीक्षेच्या कालावधीत परदेशगमन करण्यात मग्न असणारे कुलगुरू विद्यापीठच्या विद्यार्थांसाठी घातक ठरत आहेत त्यांच्या भविष्यबरोबर खेळत आहेत त्यांचे वर्ष वाया घालवत आहे. अश्या कुलगुरुनि महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुद्धा धाब्यावर बसविलेला आहे.तरी अश्या कुलगुरुनी नैत्तिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस करत आहे.