डोंगरकठोर्‍यातून बोकड लांबवले ; सतर्क ग्रामस्थांमुळे दोन चोर अटकेत

0

यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा 35 हजार रूपये किंमतीचे दोन बोकड चोरीच्या प्रयत्नात दोन चोरट्यांनी सतर्क ग्रामस्थांनी पकडले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईरफान इब्राहिम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जुन रोजी रात्री डोंगरकठोरा गावी घराबाहेेर त्यांचे दोन बोकड बांधले असताना चोरट्यांनी ते लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांना जाग आल्याने चोरट्यांनी त्यांना पकडत यावल पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, संशयीतांची नावे कळू शकली नाहीत. तपास हवालदार अजीज शेख करीत आहेत.