जळगाव।यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दरवर्षी होळी सणानिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदाही होळी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी 12 रोजी या उत्सवास प्रारंभ झाला झाले आहे.
यात्रोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. 12 मार्च रोजी जिल्हाभरात सर्वत्र होळी उत्साहात साजरी झाली त्या पार्श्वभूमीवर डोंगर कठोरा येथे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी होळी पेटविली. यात्रेनिमित्त गाव गजबजले असून सर्वत्र विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहे. सोमवारी 13 रोजी धुलिवंदला बारागाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. होळी सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंच सुमनबाई वाघ, उपसरपंच नितीन भिरुड यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. यावल पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी यांच्यासह सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला.