मुंबई : डोंबिवली पूर्वेला असलेल्या खंबाळपाडा परिसरात संध्याकाळी चारच्या सुमारास मेनहोलमध्ये पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. चंद्रभान पाचगे, महादेव धोंडीराम झोपे आणि चंद्रभान अशी या तिघांची नावं आहेत अशी माहिती समोर आली आहे. या तिघांचेही मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले असून हे तिघेही कंत्राटी कामगार असल्याची माहिती समजते आहे. मेनहोल साफ करण्यासाठी हे तिघे मेनहोलमध्ये उतरले होते. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.