नवापूर । नवापूर तालुक्यातील मौजे डोगेगाव व तारापूर येथे प्रधानमंञी उज्वला योजनेअतंर्गत आदिवासी लाभार्थ्यांना खा. डॉ. हीना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते गॅस वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप वळवी, माजी पं.स सभापती सुनिता वळवी, सरपंच हर्षाली वळवी, उपसरपंच जयसिंग नाईक, तारापुर गावाचे माजी सरपंच अनिता वळवी, रणजीत वळवी, भारत गॅस जळगाव येथील विक्री अधिकारी निलेश लठ्ठे, इंडीयन गॅसचे विक्री अधिकारी राहुल चव्हाण, पंकज चोरडीया, किरण सोनवणे उपस्थित होते.
वृक्षतोडीवर येणार लगाम : खा. गावित पुढे म्हणाल्या की, बरेचसे आजार हे चुलीवर स्वयंपाक करण्यामुळे होत असतात. यामुळे डोळ्यांचा आजार, फुफुसाचे आजार होत असतात. त्याचप्रमाणे होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगल संपत्तीसुद्धा नष्ट होत चालली आहे. वृक्षतोडीमुळे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व चिञ पाहता ही योजना सुरु केली आहे. यावेळी त्यांनी नॅशनल हायवे 6 चे कामाला ही सुरुवात झाली आहे लवकरच तो तयार होणार आहे यामुळे जिल्हाचा विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील खा. गावित यांनी यावेळी सांगितले.
132 लाभार्थ्यांना गॅस वाटप : यावेळी आ. डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी विकास मंञी असताना ही योजना मी पास केली होती परंतु विरोधकांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना तक्रार करुन ही योजना बंद पाडली होती. डोगेगाव हे गाव जलयुक्त शिवार योजनेत आले असून या योजनेचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी केले. डोगेगाव येथे 101 लाभ्यार्थीना गॅस वाटप करण्यात आले तर तारापुर येथे 31 लाभार्थ्यांना गॅस संच वाटप करण्यात आले. एकूण 132 लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले सुत्रसंचलन भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप वळवी यांनी केले.
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डोगेगाव ग्रामपंचायत तर्फे माजी पं.स सभापती सुनिता वळवी व प्रदिप वळवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन केला. यावेळी. खा.डॉ. हीना गावीत म्हणाल्या की, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गॅस देण्याची ही योजना प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी सुरु केली. सन 2011 चा जनगणनेनुसार ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात अशा सर्वाना या योजनेतून गॅस मिळणार आहे काही लोक गरीबांचा नावावर पैसे घेत आहेत, अशा लोकांमुळे काही काळ ही योजना बंद करण्यात आली होती.