यावल। तालुक्यातील डोणगाव येथे हरितसेना अंतर्गत नवसाई सर्वागीण विकास संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रभान भालेराव, सचिव अभिजीत भालेराव, सदस्य तेजस भालेराव आदी संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष चंद्रभान भालेराव यांनी वृक्षारोपणाबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. व जास्तीत जास्त लागवड करण्याचे आवाहन केले.