डोळ्यात मिरची पूड टाकून 64 हजारांची रोकड लांबवली

0

बांबरूड फाट्यावरील भर दिवसाची घटना ; डिलीव्हरी बॉयवर ओढवले संकट

पाचोरा- ऑनलाईन पार्सलची भडगाव येथे डिलेव्हरी करून पाचोर्‍याकडे परतणार्‍या डिलेव्हरी बॉयच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून आलेल्या सहा चोरट्यांनी 64 हजारांची रोकड तसेच 30 ते 35 हजार रुपये किंमतीची पार्सल लांबवली. शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पाचोरा-भडगाव रस्त्यावरील बांबरूड फाट्यावर ही घटना घडली.