मुंबई – ड्रग्जच्या विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना डोंगरी पोलिसांच्या दोन विशेष पथकाने अटक केली. अटक आरोपींमध्ये कासिम शिवानी आणि महेंद्र जैस्वाल या दोघांचा समावेश असून या दोघांकडून पोलिसांनी एमडी आणि केाकेनचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पायधुनी आणि डोंगरी परिसरात काहीजण ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी पेालिसांच्या दोन विशेष पथकाने तिथे सापळा लावला होता. सॅम्युअल स्ट्रिटजवळ कासीम हा आला असता त्याला एमडी ड्रग्ज डोंगरीतील शिवदास चापसी मार्गावरुन महेंद्र याला कोकेनसह पोलिसांनी अटक केली. चौकशीत ते दोघेही तिथे ड्रग्जची विक्रीसाठी आले होते, मात्र त्याची विक्री करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या इतर सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.