डेहराडून – एके काळी बॉलीवूडचा संजू बाबा ड्रग्ज अडडिक्ट होता, नुकताच प्रदर्शित झालेला “संजू”या चित्रपटातून याचा उलगडा झाला आहे. मात्र आता संजय दत्त उत्तराखंड राज्याचा अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी माहिती दिली.
उत्तराखंडसोबतच हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान तसेच चंदिगड आणि दिल्ली या दोन केंद्र शासित प्रदेशांचा संजूबाबा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असणार आहे.
सुरुवातीच्या काळात अंमलीपदार्थांच्या मी देखील आहारी गेले होते. त्याचा मला खूपच त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे मी या अभियानाचे कॅम्पनींग करण्यास तयार असेल असे संजय दत्त याने सांगितले असल्याची माहिती मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे.