मुंबई : ‘ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह’ प्रकरणामध्ये आता जर गाडी चालक दोषी आढळला तर त्याचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो. तसे आदेशच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. परिवहन खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून वाहनांमध्ये वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासोबतच विम्याशिवाय गाडी चालवत असल्याचं आढळून आल्यास तात्काळ गाडीच जप्त करण्याचे आदेशही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.