यावल। महिनाभरापासून वातावरणात ढगाळ वातावरणासह पावसाचा शिडकाव यामुळे आजारांची लागण होत असून येथील ग्रामीण रुग्णालयात टायफाईट, कॉलरा, डायरियाची लागण झालेल्या रुग्णालयात गर्दी वाढली होती. दरम्यान, रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने फक्त एकच नर्स तपासणी व औषधोपचार केले. वातावरण बदल पावसाळ्यात होणारा अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे साथरोग, संसर्गजन्य आजार डोके वर काढतात.
आरोग्य विभागाकडून तपासणी
यावल शहर अणि तालुक्यात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने टायफाईटची लागण झालेले रुग्ण जास्त आहेत. कॉलरा अणि डायरियाचे रुग्णही चिंताजनक आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक तक्रारी शालेय आरोग्य तापासणी केले.