ढिसाळ नियोजनामुळे मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

0

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या गया येथे प्रचारसभा घेतली. यावेळी मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीदरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोदींनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गयामध्ये जनतेला संबोधित केले. त्यावेळी सभास्थळी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान काहींनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. रॅलीदरम्यान दोन गट एकमेकांना शिवीगाळ करत होते, त्यानंतर ते हाणामारीवर उतरले. म्हणून सभेच्या इथली परिस्थिती बिघडली. लोक खुर्च्या उचलून एकमेकांच्या दिशेनं फेकू लागले. रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी एकमेकांच्या डोक्यात त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या घातल्या. त्यानंतर काही जणांनी सभा स्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ सभेच्या स्थळावर येत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली.