ढोल ताशांच्या गजरात धुळेवासियांतर्फे नववर्षांचे स्वागत

0

धुळे । गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर स्वराज्य प्रतिष्ठानच्या स्वागतयात्रेत सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. ‘जात छोडो, हिंदू जोडो’चा संदेश देत ढोल-ताशांच्या तालावर लेझीम पथक आणि युवतींच्या ढोल पथकाने त्यात नववर्ष स्वागतयात्रेचा जल्लोष, महिलांचे बारा पावली नृत्य रंग भरला. एका रथावर राममंदिराची प्रतिकृती तर दुसर्‍या रथावर गुढीपाडव्याचे महत्व सांगणारा फलक लावण्यात आला होता.

यांचा होता सहभाग
हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे सायंकाळी नारायण बुवा समाधीपासून शोभायात्रा काढण्यात आली. एकवीरा देवी पालखीचे पूजन करण्यात आले. समितीचे स्वागताध्यक्ष संदीप अग्रवाल, महापौर कल्पना सुनील महाले, विहिंपचे जिल्हाप्रमुख भाऊ रुद्र महाराज, कार्याध्यक्ष प्रदीप पाटील, राजेंद्र खंडेलवाल, विहिंप जिल्हा मंत्री भरत देवळे, उमेश चौधरी, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, सुनील नेरकर, गुलाब माळी, मनोज मोरे, संजय वाल्हे, रवींद्र आघाव, रवी बेलपाठक,हिरामण गवळी, विनोद मोराणकर, प्रदीप कर्पे त्याचबरोबर प्रतिभा चौधरी, भारती माळी, योगीता पवार, ज्योत्स्ना मुंदडा, माजी महापौर जयश्री अहिरराव, किर्ती वराडे , भारती अहिरराव, शोभा पाटील, भारती चौधरी, पूनम शिंदे, सुनिता महाले, शैला चौधरी, वर्षा पाटील, नूतन देसले, योगिता चौधरी, कविता वराडे व अन्य 100 मुली-महिला उपस्थित होत्या.

स्वराज्य प्रतिष्ठानच्या शोभायात्रोत माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माजी आ. प्रा. शरद पाटील, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, जयश्री अहिरराव, भूपेंद्र लहामगे, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित चांदोडे, शोभायात्रोच्या स्वागत समिती अध्यक्ष पगार अहिरे, कार्याध्यक्ष सागर कांबळे, निमंत्रक गौरव पवार, प्रतिभा चौधरी, अमृता पाटील, धनश्री चांदोडे, प्रिया नेरकर, सोनल अग्रवाल, ज्योत्स्ना पाटील, रोहन अग्रवाल, महेश निकम, योगेश थोरात आदी सहभागी झाले होते.