निजामपुर। साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे येथील लोकसेवा वेलफेयर फाउंडेशनद्वारे तंबाखु छोड़ो अभियानाची जनजागृती पोस्टर अभियानाची सुरूवात धुळे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या शुभ हस्ते प्रकाशीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेख रफीक दाऊद, सचिन अबरारशेख, सदस्य रजा सिकलगर, इमरान पठाण, चोपड़याचे राजमोहमद खान, धुळ्याचे सलीम सिकलगर आदी उपस्थितीत होते.
देशात व महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात तंबाखुचे सेवन वाढत आहे. तंबाखु व्यसनाने तरुण पिढीला गंभीर आजार होत आहे उदा.कँसर सारखे आजार होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी यासाठी शहरात पोस्टर लावले जाणार आहे. याला विरोध व जनजागृतीसाठी लोकसेवा वेलफेअर फाउंड़ेशन पोस्टर छापुन जिल्हात वाटप करणार आहे. या उपक्रमामुळे फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांचे कौतुक होत आहे.