तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असल्याचे फलक लावा: सलाम मुंबई फाउंडेशनकडून आवाहन

0

जळगाव– शाळेच्या प्रवेशद्वारासह शाळाच्या शंभर मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीवर बंदी आहे असे फलक लावण्याचे आवाहन सलाम मुंबई फाउंडेशनचे विवेक वाभडे यांनी केले.

शहरातील अ‍ँग्लॉ उर्दू विद्यालयात सोमवारी सकाळी तंबाखूमुक्त क्षैक्षणिक अभियान, जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी बी़डी़धाडी, सरला पाटील, नितीन भारती आदी उपस्थित होते़ यासह प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक व माध्यमिक असे एक-एक शिक्षक उपस्थित होते़ यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत तंबाखूमुक्त अभियान राबवून प्रत्येक शाळेत ही कार्यशाळा घेण्याच्या सुचना केल्या़ सलमा मुंबई फाउंडेशनचे विवेक वाभडे यांनी अकरा निकषांच्या आधारावर पीपीटीद्वारे उपस्थितांना विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कशी करावी, व तंबाखूमुक्त शाळा बनविण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.

समिती स्थापन करण्याच्या सुचना
तंबाखूमुक्त शाळा बनविण्यासाठी तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करण्याच्या सुचना प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील यांनी संबंधित अधिकाºयांना कार्यशाळेत दिल्या त्यानंतर तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन संपूर्ण अभियानाचा आढावा घेण्यात यावा, अशा सुचना देखील करण्यात आल्या.