तंबाखू मुक्तीबाबत जनजागृती

0

थाळनेर । येथे शैक्षणिक परिसर अंतर्गत तंबाखू मुक्त अभियानाला सुरवात झाली. ग्रामपंचायतच्या संयुक्त विध्यमानाने व स्वर्गीय दरबारसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थाळनेरचे सरपंच प्रशांत पाटील यांचा अध्येक्षस्थानी होते. तंबाखू मुक्तीचा शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. मुख्याध्यापक, पर्वेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यात सहभाग नोंदविला.

गावात रॅली काडून जनजागृती केली या कामी सर्व शाळेचे मुख्याध्यापक एस.डी. पाटील, अनिल पाटील, शामकांत ठाकरे, प्रवीण शिरसाठ, व्ही.बी.सोनवणे, भटेसिंग राजपूत, चंद्रशेखर पाटील, विवेक सनेर यांनी सहभाग घेतला. गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी बँड पथकाच्या साहायाने रॅली काडून तंबाखू मुक्त घोषणा देत जनजागृती करण्यात आली.