यावल- व्याजाने दिलेल्या पैशातून झालेल्या वादानंतर तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराने यावल पोलिस ठाण्यात विषारी द्रव सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. मो.फारूक मो.अब्दुल समद असे विष प्राशन करणार्या व्यक्तीचे नाव आहे. प्रथमोचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे अधिक उपचारार्थ हलवण्यात आले आहे तर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे.