दिल्लीतील प्रदूषणाच्या तक्रारींसाठी सोशल मीडिया अकाऊंट सुरु करा-कोर्ट

0

नवी दिल्ली : दिल्लीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वातावरणात धुके आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला धारेवर धरले आये. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाऊंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे.

दिल्लीतील प्रदूषणाबाबत नागरिक तक्रार करु शकतील, यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने लवकरात लवकर सोशल मीडिया अकाऊंट सुरु करावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच, 10 वर्षे जुन्या डिझेलच्या आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोलच्या वाहनांवर बंदी घालण्यास आणि आपल्या संकेतस्थळावर जुन्या वाहनांची यादी अपलोड करण्यास सुप्रीम कोर्टाने दिल्ली परिवहन विभागाला सांगितले आहे. याचबरोबर, दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.