‘तत्वत:’ शब्दावरुन सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

0

मुंबई । महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाले. सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य केली. मात्र, ‘तत्वत:’ शब्दामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटले, सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफी केली आहे. शिवाय, त्याला काही निकषही आहेत. त्यामुळे या तीन शब्दांविषयी चिंता वाटते. त्यामुळे सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी. आता चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीबद्दल सांगताना वापरलेल्या ‘तत्वत:’ शब्दावरुन सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडत आहे. ‘तत्वत:’ शब्द वापरुन सरकारवर विनोदी अंगाने टीका केली जात आहे.

तत्वतः अभिनंदनाची शेरेबाजी
आज जर पाऊस पडला तर तत्वत: उद्या शेताला पाळी पडण्याची शक्यता…, भारत अन इंग्लड मधे फायनल होण्याची तत्वत शक्यता…, आज तत्वत:आणि सरसकट हे दोन शब्द लाखमोलाचे (कोटीमोलाचे) वाटले.., मंत्री गटाचे तत्वत: आभार मानतो कारन तत्वत: काहीपन होऊ शकत, तत्वत: कर्जमाफीचे, स्वागत करायला हवे! मात्र निकष,तत्व कंचे? हेही एकदाचे स्पष्ट व्हावे!…, तत्वत: फडणवीस सरकारच अभिनंदन, तत्वत: अभ्यास संपला..!, एका वाक्यात उत्तरे द्याः प्रश्न : निकषासह सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता म्हणजे काय ?, अनेक निकषांसह श्री .देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तत्वत: मुख्यमंत्री आहेत हे आज सिद्ध झाले, शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य .हा तत्वत: शब्द काहीतरी गडबड करणारा वाटतोय!, अशी शेरेबाजी दिवसभर सोशलमिडीयावर चालू होती.