नवी दिल्ली – दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संताप व्यक्त केला आहे. तबलिगी जमातचा हा तालिबानी गुन्हा आहे. त्यांचा हा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही असे ट्विट त्यांनी केले आहे.
नकवी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा. हा बेजबाबदारपणा नाही तर गंभीर गुन्हा आहे. जेव्हा संपूर्ण देश एकत्र होऊन करोनाशी लढा देत आहे तेव्हा अशा गंभीर गुन्ह्याला माफी दिली जाऊ शकत नाही. अब्बास नकवी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन इतर मुस्लीम नेत्यांसाठी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुस्लीम नेत्यांना लोकांना आवाहन करण्याची विनंती केली आहे की, करोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाउन आणि इतर आदेशांचे कठोर पालन करा.
Prev Post