पाच वर्षानंतर रावेर महसूलची शंभर टक्के वसूली

0

वसूली बद्दल तहसिलदारांचे महसूल विभागात होतेय कौतुक

रावेर :गेल्या पाच वर्षा नंतर रावेर महसूल विभागाची प्रथमच शंभर टक्के वसूली झालेली आहे 2019/20 चे सुमारे सात कोटीचे उद्दीष्ट महसूल प्रशासना देण्यात आले होते. या बाबत वृत्त असे की प्रथमच तहसिलदार उषाराणी देवगुणे याच्या मार्गदर्शना खाली प्रथमच पाच वर्षा नंतर महसूल विभागाची 100 टक्के वसूली झाली आहे. यामध्ये 2019-20 या आर्थीक वर्षातील सात कोटीच वसुलीचे उद्दीष्टे देण्यात आले होते. ते 31 मार्च पर्यंत सात कोटी एक लाख रुपये वसूल करून सरासरी शंभर टक्के पेक्षा 100.16% वसुली पूर्ण करण्यात आली आहे यापुर्वी सन 2015-16 मध्ये शंभर टक्के वसूली झाली होती. यामध्ये जमीन महसुल 3 कोटी 2 लाख 58, गौणखनिज 3 कोटी 62 लाख शिक्षण कर- 36.लाख 15 असे एकूण 7 कोटी 1 लाख 11 वसुली पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये गौणखनिजाची आजपावेतो सर्वोत्तम 3कोटी 62 लाख 38 वसूल करण्यात आले आहे.यामध्ये अवैध गौणखनिजाचे 39 लाख 50 हजार वसुली करण्यात आली आहे.या वसूली करण्यासाठी निवासी नायब तहसिलदार संजय तायडे,संजय खारे,श्री पवार,सर्व मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले