तब्बल साडेतीन महिन्यानंतर आज पर्रीकर मंत्रालयात दाखल !

0

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते. तब्बल साडेतीन महिन्यानंतर आज मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री शेवटचे मंत्रालय तथा सचिवालयात आले होते. चतुर्थी सणावेळीच त्यांना कांदोळी येथील रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. कांदोळीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्रा येथील आपल्या मूळ घरी जाऊन त्यांनी गणेश दर्शन घेतले होते. त्यानंतर सचिवालय तथा मंत्रालयात ते कधीच आले नव्हते. तथापि, मंगळवारी नववर्ष सुरू झाले आणि मुख्यमंत्री पर्रीकर सकाळी सचिवालय तथा मंत्रालयात पोहचले. पर्रीकर येणार असल्याची कल्पना पर्रीकर यांच्या कार्यालयातील अवघ्याच कर्मचाऱ्यांना दिली गेली होती. त्यामुळे ते कर्मचारी मंत्रालयाच्या खाली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थांबले होते.