मुंबई:परळमधील ‘लालबागाचा राजा’ गणपतीला दरवर्षी भाविक भरभरून दान देतात. यावर्षीही एका भाविकाने चक्क बाप्पाला त्याचीच सोन्याची प्रतिकृती दान केली आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तीची किंमत तब्बाल ४२ लाख रुपये इतकी आहे. तसंच मूर्तीच्या मुकुटात हिराही आहे.
‘लालबागचा राजा’ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही १ किलो २७१ ग्रॅमची आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती भरीव आहे. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या वर्षीही एका भाविकाने ३१.५ लाखाची सोन्याची गणेश मूर्ती ‘लालबागचा राजा’ला अर्पण केली होती. गेल्या वर्षी भाविकांनी ‘लालबागचा राजा’ला ६.७५ कोटींचे दान दिले होते. यात सोने आणि चांदीच्या मूर्तीसह दागिन्यांचा समावेश होता.