तयारी ‘दहीहंडी’ची!

0

पिंपरी-चिंचवड । तरुणांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा गोपाळकाला म्हणजेच, ‘दहीहंडी’चा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे.

दहीहंडीसाठी लागणारी मटकी तयार करण्याची शहरातील कुंभार बांधवांची सध्या लगबग सुरू आहे. मटकींवर आकर्षक रंगरंगोटी करणार्‍या जुन्या सांगवीतील कुसूमबाई कुंभार यांचे टिपलेले हे छायाचित्र.