इंदापूर । तरुणांच्या सध्याच्या दशेला शिवचरित्रच योग्य दिशा देऊ शकेल, असे मत व्याख्याते प्रा. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचेऔचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशा:ल शिक्षण मंडळ आणि जिजामाता महाविद्यालय सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडली. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दिलिप कचरे यांनी हसत खेळत डांसावर पाळत या विषयावर गुंफले. यामध्ये त्यांनी डासांच्या विविध प्रजाती व त्यांची राहण्याची ठिकाणे व त्यांच्यापासून होणारे विविध आजार या विषयी सविस्तर माहीती आपल्या विनोदी शैलीमधे विद्यार्थ्यांना दिली. आपल्या परीसराची तसेच घराची स्वच्छता ठेवल्यास डासांचे प्रमाण कमी होईल व त्यापासून उद्भवणार्या आजारापासून आपली सुटका होऊ शकेल, असे ते म्हणाले.
शिवरायांचे विचार रुजविणे गरजेचे
छत्रपती शिवराय आणि आजची तरुणाई या विषयावर प्रा. प्रकाश पांढरमिसे यांनी दुसरे पुष्ट गुंफले. आजच्या भरकटलेल्या तरुणाईमध्ये शिवरायांचे विचार रुजविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मंजिरी धामणकर यांनी संभाषण कला या विषयावर गुंफले. प्रा. सिताराम कांबळे यांनी प्रास्ताविकामधे बहिशा:ल शिक्षण मंडळ स्थापनेविषयी व या मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमावीषयी माहिती दिली. ही व्याख्यानमाला अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य डॉ.अविनाश लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सूत्रसंचालन प्रा. मुकुंदराज सोनवणे, व्याख्यात्यांचा परिचय प्रा. मयुर पिसे तर आभार प्रा. आदेश बनकर, प्रा. ओंकार शिंदे यांनी मानले.